लवासाला शरद पवार देणार अभय - Marathi News 24taas.com

लवासाला शरद पवार देणार अभय

www.24taas.com,  मुंबई
 
लवासा प्रकरणी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लवासाचे प्रमुख अजित गुलाबचंद यांच्यासह मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीमागची नक्की कारणं कळली नसली तरी लवासाविरोधातील कारवाई थांबवण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.
 
 
लवासाला दिलेला विशेष प्रकल्पाचा दर्जा रद्द करावा म्हणून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर नगरविकास सचिव टी. सी. बेन्जामिन यांनीही लवासाच्या अनियमिततेबाबत अहवाल सरकारला सादर केला आहे. अशा स्थितीत लवासाचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या हालचाली सरकारीपातळीवर सुरू आहेत. त्यामुळेच पवारांनी थेट अजित गुलाबचंद यांच्यासह याचसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समजतंय. आता लवासाबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.
 
 
आखणी काही बातम्या
 

लवासाविरोधात फौजदारी खटला
 
मुख्यमंत्र्यांना ‘लवासा’, वाटे हवा हवासा !
 
लवासाप्रकरणी अण्णांचा सरकारवर हल्लाबोल
लवासाला पर्यावरण मंत्रालयाचा दिलासा
 
‘लवासा’विरोधात खटला दाखल होणार
 
लवासा प्रकरणी १५ आरोपींविरोधात समन्स
 
‘लवासा’ची राज्य सरकारकडून चौकशी
 
लवासाचे वासे फिरले
 

First Published: Friday, March 9, 2012, 21:46


comments powered by Disqus