Last Updated: Saturday, March 10, 2012, 22:56
www.24taas.com, मुंबई मुंबई आणि ठाण्याचे महापौरपद जिंकल्यानंतर नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मौन पाळल आहे. नाशिक महापौर कोणाचा असेल यावर त्यांनी बोलणं टाळलं आणि याबाबत लवकरच तुम्हाला समजेल,असं सांगितल. उद्धव यांच्या या भूमिकेमुळे राजकीय गणित काय असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथिनुसार जयंती. शिवसेनेच्या वतीनं मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. मुंबईतल्या चेम्बूर सर्कल इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई आणि ठाण्याचे महापौरपद जिंकल्यानंतर नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर बोलणं टाळलं आणि याबाबत लवकरच तुम्हाला समजेल. असं सांगून बाजी मारून नेली आहे.
आणखी संबंधित बातम्या नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला मनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत नाशकात शिवसेनेचे मनसेवर दबावतंत्र? नाशिकमध्ये सेनेचाच महापौर होणार !
First Published: Saturday, March 10, 2012, 22:56