Last Updated: Monday, March 12, 2012, 22:41
www.24taas.com, मुंबई 
मिरा रोड परिसरात १०० ते १५० झोपड्यांना आग लागली आहे. पोलिसांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. काही दिवसांतच या झोपड्या खाली करण्याचे काम सुरु होणार होते. पण तत्पूर्वीच या झोपड्यांना आग लागली.
घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. मुंबईतील मिरा रोड परिसरात ही घटना घडली, अग्निशामक दलाचे अनेक बबं आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले आहेत.
मात्र आग अजूनही अटोक्यात आलेली नाही, त्यामुळे अग्निशामक आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग लागण्याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. यात कोणाला हानी पोहचल्याचे वृत्त आलेले नाही.
First Published: Monday, March 12, 2012, 22:41