Last Updated: Friday, November 11, 2011, 15:25
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
मुंबईत एका मराठी सिनेमाच्या सेटवर मनसेने गोंधळ घातला. मनसेच्या चित्रपट सेनेने या सिनेमाच्या सेटवर जाऊन सिनेमाचं शूटींग थांबवण्याचा प्रयत्न केला. मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राडेबाजी करण्यात आली आहे .
मुंबईच्या कांदिवली भागात मनसे कार्यकर्त्यांनी एका मराठी सिनेमाच्या सेटवर गोंधळ घातला. या मराठी सिनेमात 20 परदेशी कलाकार काम करत असल्यानं मनसेनं सिनेमाला विरोध दर्शवला. सेटवर जाऊन कार्यकर्त्यांनी शुटींग बंद पाडलं तसचं परदेशी कलाकारांच्या परमिटची मागणीही निर्मात्याकडे केली. दुसऱ्या कलाकारांमुळे मराठी कलाकारांना संधी मिळत नसल्याचा आरोप मनसेनं केला.
First Published: Friday, November 11, 2011, 15:25