मुंबई माजी CP हसन गफूर यांचं निधन - Marathi News 24taas.com

मुंबई माजी CP हसन गफूर यांचं निधन

www.24taas.com, मुंबई
 
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांचं निधन झालं आहे. सोमवारी दुपारी हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवार पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना ते कोणताच प्रतिसाद देत नव्हते.
 
आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. हसन गफूर हे १९७४ बॅचचे आयपीएस ऑफिसर होते. हसन गफूर महाराष्ट्र पोलीस सहासंचालक एंटी करप्शन पदावर कार्यरत असतांना ३१ डिसेंबर २०१०ला पोलीस सेवेतून निवृत्त झाले. आजवर मुंबई पोलीस दलाचे ते दुसरे मुस्लीम पोलीस आयुक्त होते. १ मार्च २००८ ते १३ जून २००९ ह्या कार्यकाळात त्यांनी मुंबई पोलीस कमिशनर पद देखील भुषविले.
 
त्यांच्या कारकिर्दीत चार मोठ्या घटना घडल्या होत्या, २००८ मध्ये राज ठाकरे यांनी परप्रांतियावर साधलेला निशाणा आणि त्यानंतर राज यांना झालेली अटक ही महत्त्वाची घटना त्याच्या कारकिर्दीत घडली. तर मुंबईवर झालेला जगातील सगळ्यात मोठा हल्ला २६/११ हा देखील त्यांचाच कारकिर्दीत घडला होता. तेव्हा ते मुंबईचे पोलीस कमिशनर होते.
 
 
 

First Published: Monday, March 12, 2012, 22:45


comments powered by Disqus