Last Updated: Monday, March 12, 2012, 23:52
www.24taas.com, मुंबई 
प्रशासनावर वचक असलेल्या अजितदादांचा शाब्दिक मार आज चक्क मंत्रिमहोदयांनाही खावा लागला. राज्य सरकारकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या महानगरपालिकांना रोख रक्कम आणि पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अजितदादांनी उशिरा दिले गेलेल्या पुरस्कारांवर बोट ठेवलं. २००८-२००९ चे पुरस्कार आता दिले जात आहेत. याला जबाबदार कोण असा सवालच त्यांनी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना केला.
नेहमी आवेशात बोलणाऱ्या ढोबळेंचा आज मुड का नाही, त्याचं कारण समजलं आहे, असा चिमटा उपमुख्यमंत्र्यांनी काढला. पुरस्कार देण्यात उशीर होत असल्यानेच ढोबळेंचा उत्साह गेल्याची मिश्किल टिप्पणी अजितदादांनी केली. पुरस्कार वेळेवर दिले गेले पाहिजेत, असा आग्रह अजितदादांनी धरला.
First Published: Monday, March 12, 2012, 23:52