Last Updated: Tuesday, March 13, 2012, 09:15
www.24taas.com, मुंबई शिवसेना खासदार आनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. परांजपेंची खासदारकी रद्द करण्याची याचिका शिवसेनेच्या वतीने लोकसभाध्यक्षा मीराकुमार यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थित राहून परांजपेंनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. शिवसेना खासदार अनंत गीते यांनी ही याचिका लोकसभाध्यक्षांकडे दिली. ही याचिका आता लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे. समितीच्या अहवालानंतर लोकसभाध्यक्षा या याचिकेवर अंतिम निर्णय घेतील.
२० जानेवारीला आनंद परांजपे यांनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून ठाण्याच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी दिली होती.
First Published: Tuesday, March 13, 2012, 09:15