Last Updated: Friday, March 16, 2012, 15:05
www.24taas.com,
मुंबई 
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज बजेट जाहीर करणार यामुळे शेअर बाजारात अनेक शंका काढण्यात येत होत्या. सुरवातीला बाजार काही अंक खाली होता. मात्र मार्केट चालू होताच शेअर बाजार तेजीत सुरू झाला. बजेट मांडण्यास जशी सुरवात झाली. तेव्हा शेअर बाजार चांगलाच तेजीत होता. पण काही घोषणानंतर जवजवळ पावणे एक वाजता शेअर बाजारात घसरण सुरू झाली.
BSE चा सेंसेक्समध्ये जास्तच घसरण झाली. १०१.६५ अंशाची घसरण झाली, आणि १७५७४.२० अंशावर स्थिरावला. तर निफ्टी ५४००च्या खाली गेला. जवळजवळ २५ अंशाची घसरण झाली. आणि ५३५५.६० अंशावर पोहचला.
बजेट दरम्यान शेअर मार्केट सकाळी १२: 00वा.अर्थमंत्री प्रणव मुखर्जीने जाहीर केले की, शेअर बाजारात ५० हजारांची गुंतवणूक करणाऱ्यांना २५ हजाराची सूट मिळेल, त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना त्याचा फायदा आहे. मुखर्जी यांच्या या वक्तव्यानंतर शेअर बाजारात एकदम वाढ झाली आणि सेंसेक्स १७१ अंशांनी वाढले.
बजेट दरम्यान शेअर मार्केट सकाळी ११: ३० वा.सेंसेक्स १७८१९.२५ अंशावर १४३.४० एवढ्या वाढीसोबत शेअर बाजाराला सुरवात झाली. आणि निफ्टीची ट्रेडींगदेखील चांगली होती. निफ्टीमध्ये ५० अंशाची वाढ झाली होती. आणि निफ्टी ५४२८.५६ अंशावर पोहचला होता. सकाळी पावणे अकरा वाजता पॉवर, सेवा, आयटी स्टॉक यात वाढ दिसून आली. तर ऑईल आणि गॅस यात घसरण झाली.
First Published: Friday, March 16, 2012, 15:05