Last Updated: Saturday, March 17, 2012, 23:21
www.24taas.com, मुंबई नाशिकमध्ये शरद पवारांचा हलकटपणा दिसून आला. या नीच माणसाने घालच्या स्तरावरील राजकारण केलं आहे, अशी बोचरी टीका करताना याला आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला.
मुंबतील महापालिकेतील विजयानंतर विजयाचा उत्सव आज मुंबईत युवासनेतर्फे आयोजिक केला होता. या मेळाव्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या विजयी मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश प्रसारीत करण्यात आला. या संदेशात राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली. शरद पवार हा घाणेरडा माणूस आहे. त्यांने नाशिकमध्ये निच राजकारण केलं. शरद पवार माझा मित्र असला तरी तो धड माणूस नाही. खालच्या स्तरावरील राजकारण केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा? या केलेल्या राजकारणावरून विश्वास उडाला आहे, असे ठाकरे म्हणाले.
होय, आम्ही करून दाखवलं. तमाम जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठरवून दाखविणार आहोत. आम्ही विकासाला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे आम्ही अभिमानाने करून दाखवलं, असे सांगतोय. आमच्या नादाला लागू नका, तुमची खाक होईल, असा स्पष्ट इशारा विरोधकांना बाळासाहेब ठाकरे यांनी दिला.
२०१४ मध्ये भगवाच फडकणार - उध्दव
२०१४ च्या विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकणारच यात शंका नाही. आम्ही विधानसभेवर भगवा फडकवणार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना विजयाची भेट देणार आहोत. त्याप्रमाणे पालिका निवडणुकीत आम्ही करून दाखवलं तेच विधानसभेच्यावेळी करून दाखवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
पालिकेतील विजय हा माझा एकट्याचा नाही. येथे जमलेल्या सर्व माय-भगिनींचा आहे. कितीही कष्ट करावे लागले तरी ते मी करीन आणि विधानसभेवर भगवा पडकविन, असा ठार विश्वास उध्दव यांनी यावेळी व्यक्त केला. मी जास्त काही राजकीय बोलणार नाही, असं सांगितल्याने रामदास आठवले यांच्या नाराजीबाबत ते बोलतील अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली.
First Published: Saturday, March 17, 2012, 23:21