Last Updated: Sunday, March 18, 2012, 09:21
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार शहरातील टॅक्सचं किमान भाडं आज मध्यरात्रीपासून एक रूपयानं वाढून 17 रूपये होणार आहे. तर पुढील प्रत्येक किलोमीटरचं भाडं 50 पैशांनी वाढणार असल्यानं मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
मात्र त्याचबरोबर नवी मुंबईत किमान रिक्षाभाडं 15 रूपयांवरून 11 रूपये होणार असल्यानं तिथल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. टॅक्सी-रिक्षाच्या किमान भाड्याचा पहिला टप्पा 1.6 किमीचा असतो. मुंबईतील टॅक्सी प्रवाशांना तेवढ्या अंतरासाठी आता 17 रूपये मोजावे लागणार आहेत.
First Published: Sunday, March 18, 2012, 09:21