कुर्ल्यात कपड्याच्या गोदामाला आग - Marathi News 24taas.com

कुर्ल्यात कपड्याच्या गोदामाला आग

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतल्या कुर्ला परिसरात काल रात्री आग लागल्याची घटना घडलीय. कुर्ला फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या एका चामड्याच्या आणि कपड्याच्या गोदामाला रात्री साडेअकराच्या सुमारास ही आग लागली. नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही.
 
 
आग विझवण्यासाठी अग्निशमनदलाच्या चार बंब गाड्या आणि पाण्याच्या पाच टँकर्सना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दल कर्मचा-यांना यश आलं. दरम्यान आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या आगीत वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

First Published: Monday, March 19, 2012, 10:14


comments powered by Disqus