शिवसेना-भाजपने विश्वासघात केला - आठवले - Marathi News 24taas.com

शिवसेना-भाजपने विश्वासघात केला - आठवले

www.24taas.com, मुंबई
 
शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांनी विश्वासघात केल्याचं रामदास आठवलेंनी म्हंटलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीविषयी रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली नसल्याने शिवसेना आणि भाजप यांच्याविरोधात रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महायुतील अखेरची घरघर लागली आहे का? असा सवालच असा उपस्थित केला जात आहे. रामदास आठवले यांनी कालच वक्तव्य केलं होतं की, महायुतीमध्ये मिळालेली सर्व पदं आरपीआय परत करणार त्यामुळे महायुती फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
 
राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेल्या रामदास आठवलेंची नाराजी दूर करु असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. आरपीआयचं शिष्टमंडळ एक दोन दिवस आधी भेटलं असतं तर आठवलेंच्या उमेदवारीबाबत विचार केला असता असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरत असल्यामुळं निवडणूकीत रंगत आली आहे. काँग्रेसनं विलासराव देशमुख आणि राजीव शुक्ला यांना, राष्ट्रवादीनं वंदना चव्हाण आणि डी पी त्रिपाठींना, शिवसेनेनं अनिल देसाईंना, भाजपनं अजय संचेती यांना उमेदवारी दिली आहे. तसंच अपक्ष संजय काकडे हेही रिंगणात उतरले आहेत.
 
 
 

First Published: Monday, March 19, 2012, 14:42


comments powered by Disqus