Last Updated: Tuesday, March 20, 2012, 14:53
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प महापालिका आय़ुक्त सुबोध कुमार यांनी आज सादर केला. यात शिक्षणासाठी २,३४२ कोटी ची तरतुद करण्यात आली आहे. शाळांना पाणी व्यवस्थेसाठी ४.९८ कोटी, स्वच्छतेसाठी २५ कोटी, व्हर्चुअल क्लासरुमसाठी २८ कोटी, स्टेशनरीसाठी ९५ कोटी.
तर नेहमीच वादामध्ये राहणाऱ्या सुगंधी दुधासाठी १०८ कोटी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. महापालिका शाळांच्या पुनर्विकासासाठी ३०० कोटीची तरतुद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयुक्त सुबोध कुमार यांनी इग्रंजी माध्यमांच्या सहा नवीन शाळा सुरु करणार असल्याची घोषणाही यावेळी केली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी सन २०१२-१३ साठी २६ हजार कोटींचे बजेट सादर केले. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प २१ हजार ९६ कोटी ५६ लाखाचा होता. मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सुबोध कुमार स्थायी समितीत सादर केला. या अर्थसंकल्पात पाणी आणि वीज महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते होती.
First Published: Tuesday, March 20, 2012, 14:53