Last Updated: Tuesday, November 15, 2011, 08:05
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.याबाबत मनसेने तयारी केली आहे. त्यामुळे मनसे उमेदवारांना आता अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासू उमेदवारांसाठी मनसेची चाचपणी सुरू आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं आणखी एक नवी शक्कल लढवली आहे. मुलाखतीनंतर आता इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचं मनसेनं ठरवलंय. येत्या चार डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात येणार असून याबाबत १९ नोव्हेंबरला अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
परीक्षेत मुंबई आणि महापालिके संदर्भात प्रश्न विचारण्यात य़ेणार आहेत. ही लेखी परीक्षा पन्नास मार्कांची असून रुपारेल आणि साठे कॉलेजमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर कार्यकर्त्यांशिवाय येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं मनसेच्या उमेदवारीसाठी शक्तीप्रदर्शनाला थारा नसून उमेदवारांच्या बुद्धीप्रदर्शनावर भर देण्यात येणार आहे.
First Published: Tuesday, November 15, 2011, 08:05