राहुल वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज - Marathi News 24taas.com

राहुल वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
 
उत्तर प्रदेशातल्या लोकांनी महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, असा भावनिक सवाल उत्तर प्रदेशातल्या मतदारांना करत राहुल गांधींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राहुल यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद मग मुंबईपासून दिल्लीपर्यंत उमटले.
 
राहुल गांधींचं हे वक्तव्य म्हणजे प्रांतवाद नव्हे काय, असा सवाल करत शिवसेनेनंही टीकेची संधी सोडली नाही.

First Published: Tuesday, November 15, 2011, 09:08


comments powered by Disqus