Last Updated: Tuesday, November 15, 2011, 10:19
झी २४ तास वेब टीम, मुंबईमुंबईमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालयं. या मुलीचे तिच्या शेजा-यानेच अपहरण केल्याचं समोर आलयं.
कांदिवलीतील १४ वर्षांची ही मुलगी तिच्या काकाचा चेक भरण्यासाठी बँकेत जात होती. त्यावेळी शेजारी राहणा-या मनीष खानुलकरने तीचे अपहरण केले, तसचं या मुलीच्या काकाची सही असलेला चेक वठवून एक लाख ६५ हजार रुपयेही लंपास केलेत.
मनीषने या मुलीला गोव्यात नेऊन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये तिच्यावर बलात्कार केला. एका कारवाईदरम्यान गोवा पोलिसांनी हॉटेलमधून या मुलीची सुटका केली आहे. मनीष आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.
First Published: Tuesday, November 15, 2011, 10:19