Last Updated: Friday, March 23, 2012, 22:08
www.24taas.com, मुंबई मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं गुढीपाडव्याच्या दिवशी सिद्धिविनायक मंदीरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शनं घेतलं.
महासेंच्युरी झळकावल्यानंतर मायदेशी परतल्यावर सचिननं बाप्पांच्या चरणी पोहचला. सचिन पहाटेलाच सिद्धविनायक मंदिरात पोहचला होता. मंदिरात गणपती बाप्पांची आरतीही केली .त्यानंतर थोड्यावेळ बाप्पांची आराधनाही केली आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतला. सचिनची गणपतीवर प्रचंड श्रद्धा आहे. आयुष्यातीलपहिली सेंच्युरी करण्यापूर्वीही सचिनचे वडिल त्याला गणपती दर्शनाला घेऊन गेले होते.
सचिन तब्बल एक वर्षापासून ९९च्या फेऱ्यात फसला होता. नागपूरला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिननं ९९ वी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर १३ मार्च २०११पासून सुरू झालेली महासेंच्युरीची प्रतिक्षा गेल्या आठवड्यात संपली. तेव्हा सचिनलाही आपल्यावरील ओझं उतरल्यासारखं वाटलं. त्यामुळेच, या महाशतकाबद्दलचे आभार मानायला सचिन सिद्धिविनायक चरणी आला असावा, असं म्हटलं जात आहे.
First Published: Friday, March 23, 2012, 22:08