Last Updated: Wednesday, November 16, 2011, 06:40
झी २४ तास वेब टीम, मुंबई काँगेसचे युवा नेते आणि सरचिटणीस राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात समाजवादी पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष फारुख घोसी यांनी वांदे न्यायदंडाधिकाऱ्यांकडे मंगळवारी बदनामीची खासगी तक्रार नोंदवली.
राहुल यांच्या विधानामुळे उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्यांच्या भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार त्यांनी नोंदवली आहे. याप्रकरणी १४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रात भीक मागण्यासाठी कशासाठी जाता, या राहुल गांधी यांच्या व्यक्तव्यामुळे या मातीत राहणाऱ्या उत्तर प्रदेशमधील रहिवाशांचा अपमान झाला असून भावना दुखावल्या आहेत, असे ते म्हणाले.
First Published: Wednesday, November 16, 2011, 06:40