Last Updated: Tuesday, March 27, 2012, 12:24
www.24taas.com, मुंबई घरगुती गॅस प्रकरणावरुन अर्थमंत्री अजित पवार यांची कोंडी झाली आहे. आधी काँग्रेसने विरोध दर्शविल्यानंतर राष्ट्रवादीने सावध खेळी करण्याचा डाव रचला. मात्र, विरोधकांनी गॅस वाढीविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यात राष्ट्रवादीने उडी घेतली. काँग्रेसची धार कमी करण्यासाठी राष्ट्रवादीने विरोध करण्याचा डाव केल्याचे सांगितले तरी वाढता सर्वपक्षीय दबावामुळे अजित पवार गॅसवर गेले आहेत.
आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दरवाढीवरून गॅसवर अजित पवारांनी आणले. या घरगुती गॅस प्रकरणावरुन काल विरोधकांसह मित्र पक्षांनी यावरुन अजित पवारांना घेरलं होते. तर आज खुद्द त्यांच्या पक्षानंच गॅसवरचा कर कमी करण्याची मागणी केली आहे. पक्षातर्फे आज विधानसभेत त्याबाबतचा ठराव मांडला जाणार आहे. आता सर्वपक्षीय दबावापुढे अजितदादा झुकणार का आणि गॅसदरवाढ कमी करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अजित पवार काय म्हणालेत...
दरम्यान, घरघुती गॅस दरवाढीचा घेतलेला निर्णय मलाही नको होता. पण राज्याचा आर्थिक गाडा सुधारण्यासाठी परिस्थितीमुळे हा निर्णय घावा लागला. आज सगळ्यांना विकास हवा आहे. तर दुसरीकडे राज्यावर कर्जाचा हप्ताही फेडायचा आहे, मग हे कसे शक्य होणार आहे ? गॅसवर राज्यात कोणताही कर नाही.
फक्त मुंबईत पाईपलाईनव्दारे येणार्या गॅसवर १२.५ टक्के कर आहे पण उद्या सगळीकडे हाच पर्याय वापराला जाईल पण गॅसवर केलेली ५ टक्के वाढ योग्य आहे. राज्यात गॅस वापरणा वर्ग हा उच्च,मध्यम आणि फार कमी प्रमाणात गरीब येतो त्यातच गरीब आणि सर्वसामान्य जनता रॉकेलचा वापर जास्त करतो आणि रॉकेलवर कोणताही कर नाही.
संबंधित आणखी बातमी काँग्रेसने अजितदादांना कोंडीत पकडलं… स्वयंपाकाचा गॅस ४२०!
First Published: Tuesday, March 27, 2012, 12:24