मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद - Marathi News 24taas.com

मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेद्वारे क्वारी रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शनवर जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम 29 आणि 30 मार्चदरम्यान हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे विक्रोळीच्या काही भागात गुरुवारी 29 मार्चला तर भांडूपच्या काही भागात शुक्रवारी 30 मार्चला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
 
गुरुवार 29 मार्चला महापालिकेच्या एस वॉर्डाच्या विक्रोळी पश्चिम परिमंडळात कांजुरमार्ग पश्चिममधील नेवल डॉकयार्ड कॉलनी, विक्रोळी पूर्वमधील संतोषी माता नगर, सूर्या नगर, सनसिटी परिसराचा समावेश आहे. तसंच एन वॉर्डातील गोदरेज कॉलनी, एलबीएस मार्ग, विक्रोळी स्टेशन परिसरात आणि लोअर डेपो पाडा परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर शुक्रवारी एस वॉर्डातल्या भांडुप पश्चिम परिमंडळात प्रतापनगर रोड, क्वारी रोड, टँक रोड, सुभाष नगर, जनता मार्केट, SBS रोड पूर्व आणि पश्चिम यामध्ये मुलुंड गोरेगाव जोड रस्त्यापासून गांधी नगर जंक्शनपर्यंतचा समावेश आहे.

First Published: Wednesday, March 28, 2012, 15:46


comments powered by Disqus