Last Updated: Wednesday, March 28, 2012, 17:29
www.24taas.com, मुंबई पुण्यानंतर आता मुंबईतही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतल्या खाजगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळले. याबाबात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती घेण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान, पुण्यात स्वाईन फ्लूच्या बळींचे सत्र सुरू आहे. १७ मार्च रोजी एका विद्यार्थिनीसह महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अत्यवस्थ असलेले दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, नव्याने ६ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली होती.
दीप बंगला चौक आणि खराडी येथील शाळेमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाकडून या दोन शाळांची तपासणी करण्यात आली. सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला शिक्षकांना देण्यात आल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले होते.
First Published: Wednesday, March 28, 2012, 17:29