युवासेनेचे सिनेट सदस्य निलंबित - Marathi News 24taas.com

युवासेनेचे सिनेट सदस्य निलंबित

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई युवासेनेचे आठ सिनेट सदस्य निलंबित करण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी ही कारवाई केली आहे.
 
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पास विरोध केला होता. टी वाय बी कॉम परीक्षेतील घोळा विषयी युवासेनेने कुलगुरूंना जाब विचारला होता. कुलगुरुविरोधातील आंदोलन युवासेनेला भोवले.
 
दरम्यान युवासेनेनं मुंबई विद्यापीठासमोर जोरदार निदर्शने करत विद्यापीठाच्या गेटला टाळं ठोकलं आहे.टी.वाय. बीकॉमच्या अर्थशास्त्र पेपरवरुन न्याय देण्याची मागणी युवासेनेनं केली आहे.
 
जुन्या अभ्यासक्रमाऐवजी नव्या अभ्यासक्रमानुसार पेपर घेतल्यानं ९०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडलं आहे. या पेपरच्या गोंधळाप्रमाणे हॉल तिकीटावर केंद्राचा पत्ता दुसरा आणि परिक्षा दुसऱ्याच केद्रांवर असल्याचा प्रकार सुद्धा घडला. याची विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती.
 
मात्र विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कोणताच निर्णय घेतला नाही म्हणुन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठासमोर आंदोलन केलं. यावेळी हॉल तिकीट आणि पेपर रचनेत गोंधळ घालणाऱ्या अधिकारी आणि उच्चतंत्रशिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी युवासेनेनं केली.
 
 
 

First Published: Thursday, March 29, 2012, 13:40


comments powered by Disqus