Last Updated: Thursday, March 29, 2012, 14:01
www.24taas.com, मुंबई मुंबईत लोकलच्या पहिल्या वर्गाने (फर्स्ट क्लास) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मासिक आणि त्रामासिक पाससाठी ६ ते १५ टक्के अधिक पैसे मोजावे लागणार आहे. पासातील ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. संसदेत २०१२-१२ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात ही दरवाढ प्रस्तावित केली होती.
आता सीएसटी ते दादर किंवा चर्चगेट ते दादर मार्गाच्या मासिक पाससाठी २९५ रुपये तर त्रिमासिक पाससाठी ८१० रुपये मोजावे लागणार आहे.
सीएसटी ते कल्याण या ५४ किमि अंतराच्या मार्गासाठी मासिक पाससाठी ८५५ तर त्रिमासिक २३२५ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. चर्चगेट ते विरारच्या पासाच्या दरात ११ टक्क्यांची वाढ झाली असून मासिक पासची किंमत ९२० तर त्रिमासिक २५०० रुपये इतकी आहे.
सीएसटी-ठाणे आणि चर्चगेट बोरिवली साठी महिन्याला ५७५ तर त्रैमासिक पाससाठी १५६५ रुपये खर्च येणार आहे. सीएसटी ते वाशी मार्गासाठी नवे मासिक भाडे ५०५ तर तीन महिन्यांसाठी १३७५ रुपये पडेल.
First Published: Thursday, March 29, 2012, 14:01