अण्णा परदेशी पैशावर नाचणारा 'मोर'- बाळासाहेब - Marathi News 24taas.com

अण्णा परदेशी पैशावर नाचणारा 'मोर'- बाळासाहेब

www.24taas.com, मुंबई
 
'अण्णाचं नावचं घेऊ नका, परदेशी पैशावर नाचणारा तो मोर आहे, लांडोर आहे.' 'ह्याच्यावर आरोप करा, त्याचावर आरोप करा', ' तुम्ही कोण इतरांना सांगणारे.' असं म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्य़ा ठाकरी शैलीत अण्णांना खडे बोल सुनावले. 'संसदेच्या बोडक्यावर यांचा लोकपाल, हे कोण सांगणारे संसदेला.' बिघडलं आहे सगळं देशाला नेतृत्वच नाही.'  असं म्हणतं बाळासाहेब ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. 'झी २४ तास'शी बोलताना त्यांनी अण्णांविरूद्ध वक्तव्य केलं
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली. त्यांनी त्यांच्या ठाकरी शैलीत अण्णा हजारे यांचा चांगलाच समचार घेतला. त्यांमुळे आता पुन्हा एकदा बाळसाहेबांनी अण्णा हजारे यांना टार्गेट केलं आहे. अण्णा विरुद्ध संसद वाद या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आज आपली रोखठोक मतं मांडताना अण्णावर आसूड ओढले.
 
अण्णा म्हणजे परदेशी पैशावर नाचणारे मोर आहेत, अशी खोचक टीका बाळासाहेबांनी केल्याने आता अण्णा हजारे बाळासाहेबांना काय उत्तर देणार आहेत? हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण याआधीच अण्णांनी स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब माझ्यापेक्षा मोठे असल्याने मी त्यांचाशी काहीही बोलणार नाही. त्यामुळे आता या टीकेवर अण्णा काही बोलणार का? देशातील सध्याच्या महत्वाच्या घडामोडींवरील ही ठाकरी मतं बाळासाहेबांनी 'झी २४ तास'कडे मांडली. आपल्या नेहमीच्याच मिश्किल आणि ठाकरी भाषेत या विविध मुद्यांवर बाळासाहेबांनी भाष्य केलं.
 
 
 
 

First Published: Thursday, March 29, 2012, 17:35


comments powered by Disqus