दिवेआगर चोरी: विधानसभेत सेनेचा गोंधळ - Marathi News 24taas.com

दिवेआगर चोरी: विधानसभेत सेनेचा गोंधळ

www.24taas.com, मुंबई
 
 
रायगडमधील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातून सोन्याची दीड किलोवजनाची मूर्तीची चोरी झाली. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे शिवसनेने रायगड बंदची हाक दिल्यानंतर राज्यात घंटानाद आंदोलन केले. आज विधानसभा परिसरात आरती करून अधिक आक्रमकपणी स्वीकारला. चोरीचा तपास लावण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे अर्धातास कामकाज तहकूब करावे लागले.
 
 
पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवली होती. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा रात्री घालण्यात आला होता ज्यात एकाचा मृत्यू झाला होता.  दरोडेखोरांनी मूर्तीच्या अंगावर असलेले दागिनेही  चोरले होते. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. मात्र याच मंदिरावर दरोडा पडल्यानं भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
 
शिवसेनेनं  रायगड बंदची हाक दिली. त्यानंतर घंटानात आंदोलन करताना महाआरती केली. दरम्यान,  शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी गणेश मंदिराला भेट देवून पाहाणी केली. तर विनोद तावडे यांनी राज्यभरातील गणेश मंदिरात घंटानाद करण्याचा इशारा दिला होता.  आठवडा झाला तरी दरोडेखोर पकडले गेले नसल्यानं संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. त्यामुळे शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना अधिवेशनात धारेवर धरत गोंधळ केला. त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला. परिणामी कामकाज थांबविण्याचा निर्णय सभापतींनी घेतला.

First Published: Friday, March 30, 2012, 13:14


comments powered by Disqus