Last Updated: Saturday, March 31, 2012, 12:07
www.24taas.com, मुंबई मुंबईतल्या कुलाबा भागातल्या वुडो बारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी वेश्या व्यवसाय करणा-या आठ मुली आणि 22 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे या मुलींपैकी चार मुली या परदेशातल्या आहेत. या मुली जर्मनच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बारची मालकिन फरीदा पटेल हिच्यासह इतर पाच कर्मचा-यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही काळापासनं वुडो बारच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात वेशाव्यवसाय सुरु होता. कुलाब्यात रेडिओ स्टेशनच्या बाजुला हा बार आहे.
First Published: Saturday, March 31, 2012, 12:07