2जी स्पेक्ट्रम घोटाळा वोडाफोन कार्यालयावर छापे - Marathi News 24taas.com

2जी स्पेक्ट्रम घोटाळा वोडाफोन कार्यालयावर छापे

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
2जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकऱणी मुंबईत वोडाफोन या मोबाईल कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. सकाळी दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष टीमने या छापासत्राला सुरुवात केली. तर गुडगावच्या एअरटेलच्या कंपनीवरही सीबीआयने छापा टाकला. देशभरातील विविध मोबाईल कंपन्यांवरही सीबीआय छापा टाकत असल्याती माहिती मिळत आहे.
 
वोडाफोन आणि एअरटेल सारख्या काही नामांकित कंपन्याच्या कार्यालयावर धाडी पडल्याने सगळ्याच मोबाईल कंपन्याचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. त्यामुळे इतर मोबाईल कंपन्या यापुढे काय घडणार याकडे डोळे लावून बसले आहेत.

First Published: Saturday, November 19, 2011, 09:16


comments powered by Disqus