Last Updated: Wednesday, April 4, 2012, 16:55
www.24taas.com, मुंबई 
राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचा मुलगा क्षितिज शेट्टी अनधिकृतपणे हुक्का पीत असल्याचं आढळून आलं आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं वांद्रेतल्या झाझा या रेस्टॉरंटवर रेड टाकली असता क्षितिज त्याठिकाणी हुक्का पिताना आढळून आला.
सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांच्याशी बातचीत केले असता असे समजले की, वांद्रे येथील झाझा ह्या रेस्टॉरंटमध्ये अवैधरित्या हुक्कापान होत असतं त्यामुळे मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने धाड टाकली.
या धाडीत राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांचा मुलगा क्षितीज शेट्टी हा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता ह्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. आरोग्य मंत्र्यांचे चिरंजीवच जर अवैधरित्या हुक्कापान करीत असतील तर इतरांनी काय करावे असा सवाल तेथील स्थानिक करीत आहेत. याआधीही मुंबईत हुक्का पार्लर बंद व्हावेत अशी मागणी केली जात होती, मात्र तरीही अवैधरित्या हुक्का पार्लर हे सुरूच आहे.
First Published: Wednesday, April 4, 2012, 16:55