Last Updated: Sunday, November 20, 2011, 04:21
झी २४ तास वेब टीम, मुंबई शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. इतर मुलांप्रमाणेच गरीब मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे उद्दगार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने काढले. निमित्त होते एका कंपनीच्या ‘ग्रेट वॉल ऑफ एज्युकेशन’या मोहिमेच्या उद्घाटनाचे.
या मोहिमेअंतर्गत गरीब मुलांना पुस्तके दान करण्याच्या देशातील सर्वात मोठय़ा मोहिमेचे उद्घाटन शनिवारी लोअर परळ येथील फिनिक्स मिल परिसरात सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले. गौरव राजपूत, समरेश परिदा, राजेंद्र कालकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्वांसाठीच आदर्श असणाऱया सचिन तेंडुलकरने यावेळी केलेल्या आवाहनामुळे मदत करण्याची प्रेरणा उपस्थितांना मिळाली. दारिद्रय़रेषेखालील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या या स्तुत्य उपक्रमाशी जोडल्याबद्दल धन्यवाद करत हा उपक्रम जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, असेही सचिन म्हणाला. शिक्षणही चांगल्या भविष्यासाठी विमा आहे, यादृष्टीनेही गरीब मुलांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचे गौरव राजपूत यांनी यावेळी स्पष्ट केले
First Published: Sunday, November 20, 2011, 04:21