Last Updated: Sunday, November 20, 2011, 10:01
झी २४ तास वेब टीम, मुंबई बिग बॉसच्या प्रेक्षकांना नवीन काही तरी दाखविण्यासाठी कॅनडास्थित भारतीय हॉट आणि सेक्सी पॉर्नस्टार सन्नी लिओनला घरात आणावे लागले.
मुंबई विमानतळावर पोहचली तेव्हा बिग बॉसच्या निर्मात्यांनी तिचे स्वागत केले. सन्नीने नीळा टी शर्ट, ब्लॅक कलरचा शॉर्ट स्कर्ट घातला होता. शुक्रवारी तिने हासतच कॅमेऱयांना पोझ दिली.
वादग्रस्त बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये टीआरपी वाढविण्यासाठी दोन दिवस स्वामी अग्निवेश यांना घरात पाचारण करण्यात आले होते. प्रेक्षकही रोजच्या घरातील सदस्याच्या भांडणाला कंटाळले आहेत. त्यामुळे सेक्सी पॉर्नस्टार सन्नी लिओन बिग बॉसच्या घरात आणावे लागले आहे.
First Published: Sunday, November 20, 2011, 10:01