मुंबईत भरधाव गाडीने ८ जणांना उडविले - Marathi News 24taas.com

मुंबईत भरधाव गाडीने ८ जणांना उडविले


www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतल्या घाटकोपर परिसरातील भटवाडी मार्केटजवळ एका भरधाव वेगात असलेल्या मारूती झेन कारनं ८ जणांना जखमी केलंय.
 
वेगात असलेल्या या गाडीनं आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुकानांना टक्कर दिली. त्यामुळे दुकानांजवळ उभ्या असलेल्या लोकांना या गाडीनं उडवलं. या गाडीचा क्रमांक MH 03 AF 4432 असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणंय. गाडी चालक हा नवशिक्या असल्याचं तपासात उघड झालंय.
 
भवंस नामक असलेला ड्रायव्हर हा याच परिसरात राहतो. पण घटना घडल्यापासून तो फरार झालाय. जखमींवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणंय.
 

First Published: Saturday, April 7, 2012, 18:10


comments powered by Disqus