मुंबईत डान्सबार सुरूच, ६ बारबाला अटकेत - Marathi News 24taas.com

मुंबईत डान्सबार सुरूच, ६ बारबाला अटकेत

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतल्या ग्रीन पार्क रेस्टॉरन्टवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारून ६ बारबालांना ताब्यात घेतलं आहे. यापूर्वीही पोलिसांनी या हॉटेलवर अनेकदा छापा मारला होता.
 
मात्र पोलीस येण्यापूर्वीच हॉटेलमध्ये अलार्म दिला जात असे त्यामुळे बारबाला हाती लागत नव्हत्या. यावेळी पोलिसांनी बोगस ग्राहक हॉटेलमध्ये पाठवून यशस्वीरित्या छापा मारला.
 
इथून काही ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तसंच हॉटेल मॅनेजर, कॅशिअर आणि डीलरविरोधात पीटाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मुंबईत  अजूनही बारबाला आणि डान्सबार हे प्रकरण मिटलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री आर. आर . पाटील यांनी देखील वक्तव्य केलं होतं की, अजूनही ३० टक्के ़डान्सबार बंद झालेले नाहीत . कालच्या झाप्यामुळे गृहमंत्र्यांच्या वक्तव्याला एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे.
 
 
 

First Published: Monday, April 9, 2012, 14:49


comments powered by Disqus