Last Updated: Monday, April 9, 2012, 19:13
www.24taas.com, मुंबई 
भाजप आमदार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात आज विधान परिषदेत खडाजंगी झाली. भाजप आमदारांनी स्वस्तात सरकारी जमिनी घेतल्याचा आऱोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेत केला.
एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, पांडुरंग फुंडकर यांनीही जमिनी लाटल्याचा आरोप राणेंनी केला. कॅगच्या अहवालात ज्या मंत्र्यांची नावं आली आहेत. त्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.
त्यावर राणेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राणेंच्या आरोपानंतर विरोधकांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला. राणेंनी उचलली जीभ लावली टाळ्याला असं वागू नये, तसच बेछूट आरोप करु नयेत असं भाजप आमदारांनी म्हटलं आहे.
First Published: Monday, April 9, 2012, 19:13