Last Updated: Wednesday, April 11, 2012, 18:36
www.24taas.com, मुंबई 
मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबवर सरकारने आतापर्यंत 25 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च केला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना हि माहिती दिली आहे.
कसाबच्या संरक्षणासाठी असलेल्या केंद्र शासनाच्या आयटीबीपी या विशेष पथकावर 19 कोटी 28 लाख तर पोलिसांवर 1 कोटी 22 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खास कसाबसाठी बांधण्यात आलेल्या अंडा सेलवर सव्वा पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कसाबच्या जेवणासाठी 35 हजार तर मेडिकल खर्चावर 28 हजार रुपये खर्च कऱण्यात आले आहेत.
कसाब आर्थर जेलमध्ये असून त्याच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस मागवण्यात आलेत. त्याचा खर्च केंद्र सरकारनं करावा, अशी विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली होती परंतु केंद्राकडून याबाबत अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. कसाबच्या खटल्यात सुप्रीम कोर्टातील प्रत्येक सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना ५० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
First Published: Wednesday, April 11, 2012, 18:36