स्वाईन फ्लूने मुंबईत घेतला महिलेचा बळी - Marathi News 24taas.com

स्वाईन फ्लूने मुंबईत घेतला महिलेचा बळी

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत स्वाईन फ्लूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला धुळ्याची रहिवासी असून तीला १० एप्रिलला उपचारासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वृषाली देवरे असं या महिलेचं नाव आहे.
 
गेल्याच आठवड्यात नाशिकमध्येही स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेला होता. मुंबईत आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १४ रुग्ण आढळलेत. त्यापैकी ११ जणांना उपचार करुन सोडून देण्यात आलंय. तर ३ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पुणे, नाशिक पाठोपाठ आता मुंबईतही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्यानं प्रशासनाला याबाबत तातडीने पावलं उचलावी लागणार आहेत.
 
यापूर्वी, दीप बंगला चौक आणि खराडी येथील शाळेमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाकडून या दोन शाळांची तपासणी करण्यात आली  होती.  सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला शिक्षकांना देण्यात आल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले होते.

First Published: Friday, April 13, 2012, 16:18


comments powered by Disqus