कॅगचा दुसरा अहवाल फोडण्याचा इशारा - Marathi News 24taas.com

कॅगचा दुसरा अहवाल फोडण्याचा इशारा

www.24taas.com, मुंबई
 
जमिनींच्या कॅगच्या अहवालावरुन वादंग सुरु असतानाच,  कॅगचा दुसरा नागरी अहवालही फोडू असा इशारा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. मंत्र्यांवर ठेवण्यात आलेला कॅगचा अहवाल फेटाळण्याच्या सरकारच्या निर्णयावरही विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत टीका केलीय. भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचवण्यासाठी सरकार अहवाल स्वीकारत नसल्याची टीका खडसेंनी केलीय. येत्या मंगळवारी कॅगचा दुसरा अहवाल फोडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
 
भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनीही सरकावर टीकेची झोड उठवली आहे. कॅग अहवालावरून सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅगचा अहवाल फेटाळण्याच्या चर्चेवर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. एकीकडं १६ एप्रिलला अहवाल मांडण्याच्या गोष्टी करता आणि दुसरीकडं अहवाल फेटाळण्याच्या गोष्टी करता आणि कॅग अधिका-यांवर कारणे दाखवा नोटीसही बजावता. याबाबत सरकारनं नक्की भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

First Published: Friday, April 13, 2012, 19:48


comments powered by Disqus