Last Updated: Saturday, April 14, 2012, 15:31
www.24taas.com, मुंबई मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्टेशनदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर दुरुस्तीचे काम चालणार आहे.
सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सीएसटीवरून सुटणाऱ्या सर्व डाऊन फास्ट लोकल माटुंगा आणि मुलुंडपर्यंत डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर त्या डाऊन फास्ट मार्गावरून जातील, हार्बर मार्गावर मानखुर्द आणि नेरुळ स्टेशनदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसटीवरून वाशी/बेलापूर/पनवेल स्टेशनदरम्यान सकाळी १०.१२ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर लोकल सेवा बंद राहील. प्रवाशांसाठी सीएसटी-मानखुर्द आणि पनवेल-ठाण्यासाठी विशेष लोकल सोडल्या जातील. तर हार्बरवर माहीम आणि अंधेरी स्टेशनदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. यामुळे हार्बर लोकल या काळात लोकल सेवा बंद राहील.
मनमाड-नांदेड मार्गावर लाईन ब्लॉक 
१५ एप्रिल रोजी दुपारी २.३0 ते ६.३0 या वेळेत चिकलठाणा ते करमाडदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३0 वाजता हैदराबाद येथून निघणारी हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजर गाडी जालना औरंगाबादच्या दरम्यान अंशत: रद्द केली जाईल. १५ रोजी ३.३0 वाजता निघणारी औरंगाबाद हैदराबाद पॅसेंजर औरंगाबाद-जालनादरम्यान अंशत: रद्द केली आहे.
१५ एप्रिल रोजी काचीगुडा येथून निघणारी काचिगुडा-मनमाड पॅसेंजर जालन्यापर्यंत चालविली जाणार आहे. तसेच १५ रोजी मनमाडहून सोडण्यात येणारी नगरसोल पॅसेंजर रद्द करण्यात येत आहे. १६ रोजी नगरसोल-नांदेड पॅसेंजर नगरसोल ते जालनादरम्यान रद्द केली आहे. मनमाड येथून सुटणारी मनमाड -धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता सुटण्याऐवजी ५ वाजता सुटेल. तर नगरसोल-जालना- नगरसोल शटल रद्द करण्यात येत आहे.
१७ एप्रिल रोजी बदनापूर ते जालनादरम्यान दुपारी ३ ते ९ वाजेपर्यंत ६ तास लाईन ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे १६ एप्रिल रोजी रात्री ९.३0 वाजता सुटणारी हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजर जालना आणि औरंगाबादच्या दरम्यान अंशत: रद्द केली जाईल. औरंगाबादहून ३.३0 वाजता निघणारी औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर १७ रोजी औरंगाबाद-जालना दरम्यान अंशत: रद्द करण्यात येणार आहे. १७ रोजी काचिगुड्याहून ४.३0 वाजता सुटणारी काचिगुडा-मनमाड पॅसेंजर गाडी जालना ते मनमाडदरम्यान अंशत: रद्द केली आहे.
१८ रोजी नगरसोलहून निघणारी नगरसोल-नांदेड पॅसेंजर नगरसोल-जालनादरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. नागपूर -मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस रात्री ८.२0 ते ९ वाजेपर्यंत म्हणजे ४0 मिनिट जालना येथे थांबविण्यात येणार आहे. नगरसोल येथून सुटणारी नगरसोल-जालना शटल एक तास उशिरा म्हणजे ५.३0 ऐवजी ६.३0 वा.सोडण्यात येणार आहे.
First Published: Saturday, April 14, 2012, 15:31