मुंबईसह महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के - Marathi News 24taas.com

मुंबईसह महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के

www.24taas.com, मुंबई 
 
मुंबईला आज सकाळी  ११. १ वाजण्याच्या दरम्यान  भूकंपाचा धक्का  बसला. तर संपूर्ण राज्यात हा भूकंप जाणवला. सकाळी १०.५८ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची रिश्टर स्केलवर ५.० अशी नोंद करण्यात आली आहे. सातारा-सांगली जिल्ह्याच्या वारणावती सीमेपासून २८ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले.
 
 
मुंबईसह  राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या भागात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मुंबईत गिरगावमध्ये लोक रस्त्यावर धावले तर डोंबिवलीत अनेक घरे हादरलीत. त्यामुळे याठिकाणी भीतीचे वातावरण होते. तर कोकणात गुहागरमध्ये घरांना तडे गेल्याने वृत्त आहे. पुणे परिसरात नागरिकांना तीन ते चार सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. कोयना धरण्याच्या क्षेत्रातात भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाचा केंद्रबिंदू साताऱ्यात आहे. सातऱ्यात पु्न्हा भूकंपाचा धक्का बसला. ११.४५ वाजता हा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे सातारा आणि कोयना परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
 
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात १०  वाजून ५८ मिनिटांनी तसंच पुन्हा ११ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचे मध्यम आणि सौम्य स्वरुपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.० इतकी  मोजण्यात आलीय. सलग दोन धक्क्यांनी नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सांगली सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वारणावतीपासून २८ किलोमीटरवर आहे. भूकंपाच्या धक्क्याने अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर आले.
 
 
मुंबई परिसरातही धक्के जाणवले. मुंबईत गिरगाव, माहिम, विरार, डोंबिवलीतही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.  तर नवी मुंबईत वाशी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले.  नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी परिसरालाही भूकंपाचे धक्के जाणवले. काही ठिकाणी १० ते १२ तर काही ठिकाणी ५  ते ७ सेकंदांपर्यंत हे धक्के जाणवले. तर आज सकाळीच ८ वाजून ५३  मिनिटांनी गुजरातमध्येही भूकंपाचे धक्के बसले. भूज आणि कच्छ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले तर या भूकंपाचा केंद्रबिंदू वामना इथं होता. १२ एप्रिलला इंडोनेशियात झालेल्या भूकंपानंतर आज पुन्हा हे धक्के जाणवले
 
 
व्हिडिओ पाहा...
 

 

First Published: Saturday, April 14, 2012, 14:42


comments powered by Disqus