रिक्षाचालकांचा संप.... होणारच.... - Marathi News 24taas.com

रिक्षाचालकांचा संप.... होणारच....

www.24taas.com, मुंबई
 
आज मध्यरात्रीपासून मुंबईकरांना एका त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. राज्य सरकारनं मुंबईतल्या रिक्षाच्या किमान भाड्यात केलेली एक रुपयाची वाढ समाधानकारक न वाटल्यामुळे ऑटोरिक्षा मालक चालक संघटना कृती समितीनं नाराजी व्यक्त केली आहे.
 
त्यामुळे आज मध्यरात्रीपासून रिक्षांचा संप अटळ दिसतो आहे. हा संप बेमुदत असून त्याचा त्रास निश्चितच मुंबईकरांना होणार आहे. कारण आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांनाच प्रवास करणं अवघड जाणार आहे. मात्र संपात सहभागी होणाऱ्या रिक्षाचालकांना सरकारच्या कारवाईला सांमोरं जावं लागण्याचीही शक्यता आहे कारण सरकारन संपकरी रिक्षाचालकांचं परमिट रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
 
तर दुसरीकडे आज मध्यरात्रीपासून बेस्टच्याही किमान भाड्यात एक रुपयाची वाढ लागू होणार आहे. त्य़ामुळे पहिल्या दोन किमीच्या टप्प्यासाठी ४ ऐवजी पाच रुपये मोजावे लागणार आहेत. तर पाच किमीसाठी सात रुपयांऐवजी दहा रुपये आणि सात किमीसाठी आठ वरून १२ रुपयांची वाढ करण्यात येणार आहेत.
 
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, April 15, 2012, 13:26


comments powered by Disqus