मेडिकल कॉलेजेसमध्ये जागांची विक्री! - Marathi News 24taas.com

मेडिकल कॉलेजेसमध्ये जागांची विक्री!

www.24taas.com, मुंबई
 
राज्यात मेडिकल कॉलेजेसमध्ये जागांची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोपाची चौकशी होणार आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी  केली आहे.
 
काही राजकीय नेत्यांच्या कॉलेजेसमध्ये लक्षावधींचे रुपयांचे डोनेशन घेतले जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला होता. याबाबतचं स्टिंग ऑपरेशनच त्यांनी यावेळी विधानसभेत सादर केलं. हा सुमारे ३०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप खडसे यांनी केलाय. यात डॉ. डी. वाय पाटील कॉलेज, तेरणा कॉलेज आणि एमजीम कॉलेजचा समावेश असल्याचा आरोप खडसेंनी नावानिशी केलाय.
 
त्यानंतर याप्रकरणी चौकशीची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी केलीय. समिती स्थापन करुन या गंभीर आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे.

First Published: Monday, April 16, 2012, 22:56


comments powered by Disqus