Last Updated: Tuesday, April 17, 2012, 14:45
www.24taas.com, मुबंई 
सिने दिग्दर्शक सुभाष घई हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. व्हिसलिंग वुडसप्रकरणी सुभाष घई अडचणीत आले आहेत. त्यासाठीच सुभाष घई राज यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतं आहे. राज यांच्या भेटीमध्ये सुभाष घई यांनी गोरेगाव येथील जमिनीप्रकरणी बातचीत केल्याचे समजते.
राज ठाकरे यांच्याकडे सुभाष घई यांनी आपले गाऱ्हाणे मांडले, त्यात त्यांच्या व्हिसलिंग वुडसच्या जमिनी संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश आणि त्यामुळे त्यांचा इन्सिट्यूटमध्ये शिकत असणारे विद्यार्थी हे अडचणीत येणार आहेत.
या विद्यार्थ्यांनी लाखो रूपये भरून सुभाष घई यांच्या इन्सिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आहे. जर हि जमिन सरकारला परत केल्यास विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होणार आहे. त्यामुळेच सुभाष घई ह्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
First Published: Tuesday, April 17, 2012, 14:45