'कॅग'वरून विधानसभेत जोरदार राडा... - Marathi News 24taas.com

'कॅग'वरून विधानसभेत जोरदार राडा...

www.24taas.com, मुंबई
 
बहुचर्चित कॅगचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी विधानसभेत मांडण्यात आला. मात्र सदस्यांना अहवालाच्या प्रती देण्यास सरकारनं टाळाटाळ केली आहे. त्यामुळे विधानसभेत गोंधळ झाला. तर अहवालात शुद्धलेखनाच्या चुका असल्यामुळे प्रती देण्यात आल्या नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
 
कॅगचा अहवाल मांडण्यापूर्वीच फुटल्यानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी रंगली होती. त्यातच अहवाल सादर होताच विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार गोंधळ झाला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. त्यानंतर विरोधक हे जास्तच आक्रमक झाले. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
 
कॅगमध्ये लवासावरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. सार्वजनिक हितापेक्षा खाजगी हिताला प्राधान्य दिल्याचं या अहवालात म्हणण्यात आलं आहे. त्याचबरोबर लवासाच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शीपणा नसल्याचंही या अहवालात म्हणण्यात आलं आहे.
 
 
 
 

First Published: Tuesday, April 17, 2012, 15:06


comments powered by Disqus