Last Updated: Tuesday, April 17, 2012, 21:11
www.24taas.com, मुंबई अंधेरी आरटीओनं 198 संपकरी रिक्षा मालकांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार रिक्षा चालकांचा हा संप शिक्षेस पात्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेवर आरटीओ ठाम आहे. कारवाई केल्यास कायदेशीर उत्तर देण्याचा इशारा शरद रावांनी दिलाय.
मुंबईतल्या संपकरी रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी अंधेरी आरटीओनं कारवाईचा बडगा उचललाय. 198 संपकरी रिक्षामालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या रिक्षा मालकांकडून समाधानकारक उत्तर नं मिळाल्यास त्यांचा परवाना 45 दिवसांसाठी रद्द निलंबित होऊ शकतो किंवा 3000 रूपयांचा दंड होऊ शकतो.
आरटीओनं या रिक्षांच्या परवाना धारकांना कारणे दाखवा नोटीस वजावली आहे. त्याला रिक्षा युनियनचे नेते शरद राव यांनी विरोध केलाय. कारवाई केल्यास कायदेशीर उत्तर देऊ असं इशारा त्यांनी दिलाय. आरटीओनं यावेळी रिक्षा संपाबाबत कठोर भुमिका घेतलीय. शरद रावही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या संघर्षाची झळ प्रवाशांना बसू नये अशी अपेक्षा आहे.
First Published: Tuesday, April 17, 2012, 21:11