मुंबईच्या नगरसेवकांनी लाटले लॅपटॉप - Marathi News 24taas.com

मुंबईच्या नगरसेवकांनी लाटले लॅपटॉप

www.24taas.com, मुंबई
 
 
मुंबई महापालिकेन नगरसेवकांना पाच वर्षाच्या मुदतीवर दिलेले लॅपटॉप नगरसेवकांनी लाटल्याचं उघड झालयं. या लेपटॉपसाठी महापालिकेने नगरसेवकांना नोटीस जारी केल्यानंतर फक्त १३८ नगरसेवकांनी लॅपटॉप परत केले. तर ३१ नगरसेवकांनी लॅपटॉप अर्ध्या किंमतीत विकत घेतले आहेत. मात्र ६३  नगरसेवकांनी लॅपटॉप दिले नसल्यामुळे महापालिकेने प्रोपर्टी टॅक्स मधून ही किंमत वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
मुंबई महापालिकेत २००७ च्या निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना पाच वर्षाच्या मुदतीवर दिलेले लेपटॉप दिले होते.  महापालिकेन लॅपटॉपवर २२७ नगरसेवकांसाठी २ कोटी ७६  लाख खर्च केला होता. महापालिकेन नगरसेवकांना नोटीस जारी केल्यानंतर  १३८ नगरसेवकांनी लेपटॉप परत केले. तर ३१ नगरसेवकांनी लेपटॉप अर्ध्या किंमतीत विकत घेतले आहेत.मात्र 63 नगरसेवकांनी लेपटॉप दिले नसल्यामुळे पालिकेन प्रोपर्टी टॅक्स मधून ही किंमत वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
पालिकेचे लेपटॉप लाटणा-या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे ४६ नगरसेवक आहेत.तर अपक्ष,कॉंग्रेस,अभासेच्या नगरसेवकांनी लेपटॉप परत केलेले नाहीत.मात्र महापालिकेन प्रोपर्टी टॅक्स मधून किंमत वसूल करण्याचा आदेश जारी केलाय. मात्र लॅपटॉप मधला डेटा काढण्यास उशिर झाल्याचा खुलासा नगरसेवक गीता गवळींनी केला आहे.
 
 
महापालिकेनं दिलेले लॅपटॉप परत करण्यास बरेच नगरसेवक राजी नाहीत. त्यातच नवीन नगरसेवकांनी लॅपटॉप अथवा आयपॅडची मागणी केलीयं. महापौरानीही नव्या नगरसेवकांना आयपॅड द्याव देण्याची मागणी आयुक्ततांकडं केलीयं. आता यात आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Wednesday, April 18, 2012, 11:55


comments powered by Disqus