इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहाल - Marathi News 24taas.com

इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहाल

www.24taas.com, मुंबई
 
 
मध्य आणि हार्बरची  रेल्वे वाहतूक  विस्कळीत झाल्याने याचा ताण  रस्तेवाहतुकीवर पडला आहे. इस्टर्न हायवेवर वाहनांची गर्दी  वाढलेली दिसून येत आहे. वाहतुकीची सेवा सुरळीत नसल्याने  प्रवाशांचे मेगाहाल झाले आहेत. त्यातच वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून बेस्टने १३४ मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत.
 
 
 
मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने धावत असल्याने मुंबईकरांनी कार्यालयात पोचण्यासाठी महामार्गाचा पर्याय निवडला. यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. अनेकांनी कार्यालयात पोहचण्यासाठी बेस्ट बसचा पर्याय निवडला. दरम्यान मध्य रेल्वेने बेस्ट बस प्रशासनाला अतिरिक्त बस चालवण्याची विनंती केल्यानंतर १३४ मार्गांवर बस सोडण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांना  बसने तसेच पायी  आपले कार्यालय गाठण्याचा प्रयत्न चालवला आहे.  दरम्यान इस्टर्न हायवेववरील  वाहतुकीची कोंडीची समस्या दुपारी दीडपर्यंत सुटण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
घाटकोपर, कुर्ला, भिवंडी, भांडुप, ठाणे, विद्याविहार येथून जादा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. बेस्टने एकूण १३४ मार्गावर जादा बस सोडल्या आहेत. तर  दादर, कल्याण, डोबिंवली, घाटकोपर, कुर्लासह महत्वाच्या  स्टेशनवर अलोट गर्दी झाली आहे. रेल्वेचा पास असणा-या प्रवाशांना एक्सप्रेस गाडीतून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 
 
सकाळी आठ वाजता ७० टक्के गाडया मध्य रेल्वे मार्गावरुन धावत होत्या. मात्र या गाड्या उशीरा, संथ गतीने धावत आहेत. त्यामुळे सर्वच स्थानकावर  गर्दीचे चित्र दिसत आहे. हार्बर लाईनवरीलही सेवा विस्कळीत झाली आहे. सिग्नल यत्रंणा दुरुस्त करण्यास किमान दोन दिवस लागतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दिली.
 
 
फोटो पाहण्यासाठी क्लिक करा...
 
मुंबईकर प्रवाशांचे मेगाहाल

First Published: Wednesday, April 18, 2012, 14:10


comments powered by Disqus