Last Updated: Wednesday, April 18, 2012, 19:47
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महापालिकेने १९ सप्टेंबर २०११ च्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय घेतला होता. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनने औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती.
म्युनिसिपल मजदूर युनियनच्या याचिकेवर औद्योगिक न्यायालयाने पालिका कर्मचाऱ्यांना बोनस-सानुग्रह अनुदान १२ टक्के व्याजासहीत ३० दिवासाच्या आत देण्याचा निर्णय दिला आहे. पालिका कर्मचाऱ्यांना २०११ च्या दिवाळीआधी बोनस नाकारला होता. त्या विरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनने उच्च नायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर उच्च नायालयानं बोनस न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना ७५०० बोनसपोटी देण्याचा आदेश दिला होता. मात्र ७५०० रूपये पालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी संपकरी कर्मचाऱ्यांच्या पगारातनं कापण्याचे आदेश दिले होते. यानंतर म्युनिसिपल मजदूर युनियननं पुन्हा बोनस - सानुग्रह अनुदानसाठी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती.
First Published: Wednesday, April 18, 2012, 19:47