Last Updated: Thursday, April 19, 2012, 11:28
www.24taas.com, मुंबई 
आज दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या लोकल्स अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहेत त्यामुळं आज पुन्हा इस्टर्न एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जॅम झाला असून सुमन नगरजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत.
रस्त्याचा पर्यायही कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहचवू शकणार नसल्याचं चित्र दिसतं आहे. तर दुसरीकडं सिग्नल दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या पीआरओंनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने धावत असल्याने मुंबईकरांनी कार्यालयात पोचण्यासाठी महामार्गाचा पर्याय निवडला. यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. अनेकांनी कार्यालयात पोहचण्यासाठी बेस्ट बसचा पर्याय निवडला. दरम्यान मध्य रेल्वेने बेस्ट बस प्रशासनाला अतिरिक्त बस चालवण्याची विनंती केल्यानंतर बस सोडण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांना बसने तसेच पायी आपले कार्यालय गाठण्याचा प्रयत्न चालवला आहे.
First Published: Thursday, April 19, 2012, 11:28