Last Updated: Thursday, April 19, 2012, 16:49
www.24taas.com, मुंबई शिवाजी पार्कवर फूट फेस्टिव्हल आयोजित करण्यास परवानगी मिळावी या मागणीची मनसेची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली.
मनसे ४ मे ते १६ मे दरम्यान शिवाजी पार्कवर महोत्सव आयोजित करणार होती. या महोत्सवाला परवानगी मिळवी म्हणून मनसेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
मात्र, शिवाजी पार्कला यापूर्वीच ‘सायलेन्स झोन’ म्हणून जाहीर केल्याने मनसेची याचिका फेटाळण्यात आली.
यापूर्वी, शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी मनसेनं दाखल केलेली याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
First Published: Thursday, April 19, 2012, 16:49