Last Updated: Friday, April 20, 2012, 11:29
www.24taas.com, मुंबई 
कमी किंमतीची घरं बांधण्यासाठी सध्याच्या काही इमारती पाडाव्या लागतील, अशी माहिती हिरानंदानी बिल्डर्सनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. पवई क्षेत्र विकास योजनेअंतर्गत, ४० चौरस मीटरचे १५१२ फ्लॅटस आणि ८० चौरस मीटरचे १५९३ फ्लॅट्स बांधण्याचे आदेश न्यायालयानं २२ फेब्रुवारीला हिरानंदानी बिल्डर्सला दिले होते.
पवई क्षेत्रातली इतर बांधकामे थांबवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि स्थानिक कमलाकर सातवे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं हिरानंदानी बिल्डर्सला आदेश दिले होते.
पवई येथे कोणतेही नवे बांधकाम करण्यापूर्वी तेथील स्थानिकांसाठी घरे बांधावीत, या आदेशाचे पालन व्हायलाच हवे. त्यासाठी तेथे सध्या पुरेशी मोकळी जागा उपलब्ध नसेल तर हिरांनदानी बिल्डरने तेथे याआधी केलेली बांधकामे तोडावी लागणार आहेत.
First Published: Friday, April 20, 2012, 11:29