Last Updated: Friday, April 20, 2012, 14:50
www.24taas.com, मुंबई लोअर परळ येथील 'द वीक' मासिकाच्या काही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून वाद झाल्याने राजकीय हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन जण जखमी झालेत.
'द वीक'च्या व्यवस्थापन विपणन आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. यामध्ये राजकीय कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करताना हा हल्ला केला. दरम्यान, या कर्मचा-यांना कंत्राटदारामार्फत वेतन दिले जाते. सेवेत कायम करून घेण्याबाबत कर्मचा-यांच्या अर्जांवर औद्योगिक कोर्टात सुनावणी प्रलंबित आहे. एका कर्मचा-यानेही बडतर्फीविरोधात कोर्टात दाद मागितली असून ते प्रकरण सध्या प्रलंबित आहे, अशी माहिती मासिकाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्रीकुमार मेनन यांनी दिली.
३८ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी आंदोलन करणा-या शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्यासह ३० जणांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यावेळी झालेल्या मारहाणीत तीन कर्मचारी जखमी झाले. कंत्राटदारामार्फत वेतन दिले जात असताना पेडणेकर यांच्यासह काही कर्मचारी कार्यालयात घुसले. त्यांनी बडतर्फ कर्मचा-यास पुन्हा सेवेत घेण्याची मागणी करून सर्क्युलेशन मॅनेजर गोगी झकारिया यांना मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Friday, April 20, 2012, 14:50